बाजारातून छत्री विकत घ्यायची आहे, ‘या’ टीप्सचा उपयोग होईल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात सगळ्यात आधी आठवते या शक्यच नसतं. काही वेळा छत्री असूनही भिजायला होतं.  याकरिता छत्री विकत घेताना कोणत्या टिप्स वापराव्यात हे माहीत असणं आवश्यक आहे. जेणेकरून पावसाळ्यात संपूर्ण पावसाळा विकत घेतलेली छत्री योग्यरित्या वापरणं शक्य होणार आहे.

  • जी छत्री खरेदी कराल ती 10 किंवा 11 इंच लांबीची असेल हे पाहा, जेणेकरून छत्री धरायला सोपं पडेल.
  • छत्रीचा आकार मोठा चांगला असावा जेणेकरून शरीर भिजणार नाही.
  • छत्रीचे हँडल आरामदायक असावे, गुळगुळीत नसावे, नाहीततर जास्त वेळ छत्री पकडल्यास हातातून निसटू शकते.
  • छत्रीच्या दांड्याला गंज लागला असेल, तर ती छत्री विकत घेऊ नका. काही दिवसांनी छत्री उघडायला त्रास होऊ शकतो.
  • छत्रीच्या किमतीपेक्षा तिचे कापड, हँडल, तारा याचा दर्जा पहा.
  • छत्री हातात पकडायला त्रास होत असेल तर बॅगेत मावेल अशी छत्री विकत घ्या.
  • दुकानातच छत्री उघडून पाहा. म्हणजे छत्रीचं कापड, हॅंडल कसं आहे, ते कळेल.
  • लहान मुलांसाठी छत्री विकत घेताना त्यांच्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या छत्र्या बाजारात उपलब्ध आहेत. त्या घेऊ शकता.