प्राणीसंग्रहालयातील सिंहांना लवकरच मिळणार कोरोना लस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय कृषी संशोधन परिषद ICAR ने अँकोवॅक्स ही हिंदुस्थानातील प्राण्यांसाठी पहिली लास विकसित केली. लवकरच आता ही लस प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना देण्यात येणार आहे. ICAR यासाठी शिफारस करणार आहे. हिंदुस्थानातील प्राणीसंग्रहालयांमध्ये आतापर्यंत सोळा सिंहांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी बहुतांश सिंहांचा मृत्यू झाला आहे. सिंहांचे कोरोना मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने लसीचा पहिला वापर सिंहांवर केला जाणार आहे.

ICAR च्या डायरेक्टर जनरल डॉ. त्रिलोचन महापात्रा म्हणाल्या की लसीचे तंत्रज्ञान तयार आहे, परंतु ही लस अंतिम वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारी मंजुरी आवश्यक आहे. 9 जून रोजी लाँच करण्यात आलेल्या या लसीची विविध शहरांतील सैन्य, पाळीव प्राणी आणि भटक्या कुत्र्यांवर तसेच वन्य आणि प्रयोगशाळेतील प्राण्यांवर सुरक्षितपणे चाचणी करण्यात आली आहे.