तळीरामांच्या खिशाला कात्री! दारुवरील उत्पादन शुल्कात वाढ

महसूलात वाढ व्हावी यासाठी महायुती सरकारने दारूवरील उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता दारू महागणार असून मद्यप्रेमींच्या खिशाला कात्री लागणार आहे.

हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर तीन टक्क्यावरून साडेचार टक्के करण्यात आला आहे. देशी मद्यावरील उत्पादन शुल्क 180 रुपयांमवरून 205 रुपये करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढवणार आहे.

उत्पादन शुल्क विभागाकडून मद्याच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. 180 मिली देशी मद्याच्या दरात 80 रुपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रुपये,  हिंदुस्थानी बनावटीचे विदेश मद्य 205 रुपये, विदेशी मद्याच्या प्रिमीयम ब्रँडची किंमत 360  रुपये इतकी झाली आहे