तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी दीड वाजता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी आरे कारशेडविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्याखेरीज राज्यातील शेतीविषयक तसेच कोरोनाविषयीही जनतेला संबोधित केले. या लाईव्हमधील भाषणाचे काही महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  • अजिबात गाफील राहू नका आणि कोरोनाचा बळी ठरू नका
  • ज्याप्रमाणे आतापर्यंत सहकार्य केलं तसं यापुढेही करायचं आहे, आणि या पुढे देखील पाळा
  • आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे
  • पुन्हा लॉक डाऊन करावा लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
  • जे सुरू केलं ते पुन्हा बंद करावं लागु नये म्हणून खबरदारी घ्यावी लागेल
  • मास्क नाही तर प्रवेश नाही हे सूत्र पाळाव
  • लोकल रेल्वे वाहतूक वाढवून मागत आहोत
  • सार्वजनिक ठिकाणी, स्वच्छता गृहात मास्क काढू नका
  • मानवी शरीरावर नऊ तास विषाणू जिवंत राहू शकतो
  • अनेकांना मास्क काढून बोलायची सवय आहे. ती घातक ठरते आहे
  • मास्क नीट वापरावा, तोंडाला हात लावणे टाळा
  • महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे
  • पुष्पा वाडे या आशा वर्कर यांनी एका गर्भवती भगिनींना आग्रह करून तपासणी करून उपचार करवले
  • नगर जिल्ह्यातील सुदाम जाधव यांनी एका रुग्णाचा जीव वाचवला आहे.
  • माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबवणाऱ्या सगळ्यांचे आमच्यावर खूप उपकार आहेत
  • ही लढाई आहे. ती जनतेच्या सोबतीने, त्यांना विश्वासात घेऊन जिंकायची आहे
  •  वेळेत तपासणी करा आणि उपचार करा
  •  शिंकल, खोकल की हा विषाणू पसरत आहे
  • नागरिकांनी दुर्लक्ष करू नका आणि घाबरु नका
  • सगळी यंत्रणा अतिशय ताणात काम करते
  • त्यासाठी अनेक सोयीसुविधा देत आहोत
  • ज्यांना आरोग्य समस्या आहेत त्यांना कोरोनाचा धोका जास्त
  • 70 ते 80 टक्के रुग्ण सौम्य आणि अती सौम्य लक्षणांचे रुग्ण
  • 2 हजार व्हेंटिलेटर वर आहेत
  • 40 हजार रुग्णांचा मृत्यू
  • त्यातील 12 लाख 15 हजार 779 बरे झाले
  • राज्यभरात एकूण 15 लाख 17 हजार 734 रुग्ण
  • कोरोनाला थांबवण्याची गरज आहे.
  • शिवभोजन थाळीला प्रतिसाद, 2 कोटी 2 लाख थाळ्या विकल्या गेल्या आहेत
  • 375 सरकारी आणि 100 आसपास चाचणी केंद्र
  • अनलॉक करताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे
  • आता हळूहळू आपण सर्व सुरू करत आहोत
  • वेगवेगळ्या कृषी संस्थांशी बोलणं सुरू आहे. मगच आपण निर्णय घेणार आहोत.
  • केंद्रीय कृषी धोरणाबाबत नीट विचार करून मगच निर्णय घेणार
  • बाजारपेठ आणि शेतमाल यांची जुळवणुक करण्याच्या दिशेने आपण जात आहोत
  • आपण साठवणूक केंद्राची स्थापना करत आहोत
  • माझा शेतकरी गरीब आहे. तो वर्क फ्रॉम होम करू शकत नाही
  • ज्याला हमखास भाव मिळेल ते पिकवण्यासाठी प्रोत्साहन
  • जे विकेल ते पिकेल साठी जनजागृती करत आहोत
  • शेतकरी बंधूंना वाऱ्यावर सोडणार नाही
  • ज्यांचं नुकसान झालंय त्यांना नुकसान भरपाई मिळेल
  • गेल्या काही दिवसात अनेक शेतकऱ्यांना नुकसान झालं आहे
  • पर्यावरण जपण्याचं काम आपण केलं आहे, त्याचं समाधान
  • या कामासाठी मदत करणारे उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांच्यासह मेट्रो कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो
  • एकही पैसा वाया जाऊ देणार नाही
  • लोकांचा पैसा लोकांसाठीच वापरण्यात येणार
  • जमिनीसाठी एक पैसाही द्यावा लागणार नाही
  • आरे कार शेड जिथे उभारण्यात येणार आहे ती जमीन सरकारची आहे.
  • आरे कार शेड कांजूर येथे तयार होणार
  • या जंगलाची व्याप्ती 800 एकर झाली आहे.
  • आरेची 600 एकर जमीन जंगल घोषित केलं आहे.
  • आरे कारशेडला माझा विरोध होता
  • मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्ह ची सुरुवात करतो
  • कोरोना हा घरात घुसलेला पाहुणा आहे, जो लवकर जात नाही.
  • त्यांच्या शिकवणीकडे लक्ष दिलं असतं तर अनेक गोष्टी टाळू शकलो असतो
  • इतका काळ लोटला तरी त्यांची शिकवण ताजी
  • सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो
  • मी तुमच्या काळजीपोटी तुमच्याशी संवाद साधतो
  • पण घाबरु नका, मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे
  • जेव्हा मी तुमच्याशी बोलायचो तेव्हा तुमच्या मनात भीती उत्पन्न होत असेल
  • मी आपल्याशी आधी वारंवार संवाद साधत होतो, कारण ती परिस्थिती तशी होती
  •  दीड वाजता हे लाईव्ह सुरू होईल
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणार आहेत.