Lok Sabha Election 2024 Voting Update : दुपारी तीन वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान

देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसत आहे. तसेच काही ठिकाणी मोबाईल बंदीच्या निर्णयामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.

  • दुपारी 3 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 42.35 टक्के मतदान झाले. आकडेवारी पुढीलप्रमाणे
  • नंदुरबार – 49.91, जळगाव – 42.15, रावेर – 45.26, जालना – 47.51, छ. संभाजीनगर – 43.76, मावळ – 36.54, पुणे – 35.61, शिरूर – 36.43, नगर- 41.35, शिर्डी – 44.87, बीड – 46.49

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान केंद्रावर दुपारी शुकशुकाट पाहावयास मिळाला.

  • दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 30.85 टक्के मतदान झाले.
  • लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील सकाळी 11 वाजेपर्यंत 11 लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे…

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

  • राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत अकोले येथे सर्वाधिक 22.5 टक्के मतदान
  • राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत शिर्जीत येथे सर्वात कमी 15.37 टक्के मतदान

छत्रपती संभाजीनगर: 20 हून अधिक ठिकाणी EVM मशीन बंद, मतदारांची नाराजी

  • महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
  • काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी बजावला मतदानाचा हक्क
  • देवळाली प्रवरा येथिल 279 मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी 85 वर्षाच्या आजीबाईस नातवांनी आधार देवून मतदान केंद्रावर घेवून जाताना
  • पुण्यातील मॉडेल कॉलनी येथे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान ठप्प
  • महाराष्ट्र सकाळी 9 वाजेपर्यंत 6.45% मतदान
  • अकोले येथे लोकसभा निवडणूक 2024 मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
  • राहुरी तालुक्यातील येवले आखाडा मतदान केंद्र 44 येथे मशीनमध्ये तारखेचा घोळ असल्यामुळे अर्धा तास उशिरा मतदानाला सुरुवात
  • रविवार पेठ, पुणे येथे मतदानाला सुरूवात
  • पारनेरमध्ये भाजपने पैसे वाटल्याचा निलेश लंके यांचा आरोप, कारवाई करण्याची मागणी
    जागरुक मतदार हा लोकशाहीचा आधार, जनतेने मतदान करावे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आवाहन
  • महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके समर्थक सरपंच शरद पवार यांना प्रशासनाची नोटीस; 10 ते 12 या वेळेत मतदान करता येणार
  • देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह दिसत आहे. तसेच काही ठिकाणी मोबाईल बंदीच्या निर्णयामुळे गोंधळ निर्माण झाला आहे.
  • देशभरात 96 मतदारसंघात मतदान
  • राज्यात 11 मतदारसंघात मतदानाला सुरुवात
  • नगर, शिर्डीत मतदानाला सुरुवात अनेक ठिकाणी मतदारांचा निरुत्साह
  • नगरमध्ये निलेश लंके यांनी मतदानाचा हक्क बजावला
  • खारघरमधील पोलिंग बूथवर मतदानाला गर्दी, मोबाईल फोन आत नेण्यास मनाई करण्यात आल्याने अनेक मतदार माघारी परतले