LIVE: महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकवणारच – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नगर

  • दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आपण धावणार
  • पाऊस भरपूर पडतोय पण हा पाऊस थापांचा
  • नगरमधला राजकीय दुष्काळ संपवणार
  • ऊज्वल योजनेच्या महिला लाभार्त्यांना अनुदान मिळतच नाही.
  • पाऊस भरपूर पडतोय पण तो थापांचा पाऊस
  • डोकी जर गरम होणार नसतील तर थापाडेच राज्य करतील
  • महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकवणारच – उद्धव ठाकरे
  • शिवसैनिकांनो घराघरात पोहोचा
  • माझ्या शिवसैनिकांकडून अपेक्षा
  • चूल पेटवा लोकांची घरं पेटवू नका
  • एकदाचा निर्णय घ्याच
  • मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणही मिळालेच पाहिजे.
  • मराठा आरक्षणाला का पाठिंबा देऊ नये
  • ऑक्टोबरमध्येच दुष्काळजन्य परिस्थिती पण राजकीय पक्षांचे निवडणुकीकडे लक्ष
  • पाण्याची बोंब आणि घरपोच दारू देणार आम्ही विरोध केला मग ‘आम्ही असं बोललोच नाही’ असं हे सरकार सांगत आहे, दारू पिऊन बोलला होता का? सत्ताधारांनी रामाची शपथ घ्यावी आणि सांगावे राम मंदिर बांधतोय
  • राम मंदिराबाबत कायदा करा शिवसेना तुमच्या पाठीशी
  • राम भागवत यांनी राम मंदिराचा मुद्दा काढल्याबद्दल त्यांचे अभिनंदन
  • अटलजींना मर्यादा होत्या, पण आता विष्णूच्या ११ व्या अवताराचं सरकार येऊनही राम मंदिर होत नाही.
  • अच्छे दिन कधी येणार, टोल माफी, घरात पाणी सगळं जुमला
  • आत्मविश्वास नसणार्‍यांच सरकार येतं
  • नंतर सांगणार ते जुमला होता.
  • २०२२ ला घरं हवी तर २०१९ ला कुणाला मत देणार
  • विरोध नाही तर सत्य तेच बोलणार
  • शेतकरी कर्जमाफीचा घोटाळा कोणी केला?
  • रामदासभाई सरकारला कर्जमाफीबद्दल विचारा
  • मी जनतेची बाजू मांडतो.
  • ज्यांचा नगरसेवक  छिंदम आहे तो पक्ष कसा असेल
  • छिंदम ने अजूनही राजीनामा दिला नाही आणि आमच्या पक्षातील महिलेच्या विरोधात मोक्का लावता
  • खून मोकाट करणारे मोकाट आणि चांगले काम करणारी आमच्या कार्यकर्तीवर मोक्का
  • दुर्दैवाने महिलांसाठी सर्वाधिक असुरक्षित हिंदुस्थान
  • प्रभू रामचंद्र आणि शिवरायांची प्रतिमा फक्त पुजण्यासाठी नाही तर आम्ही त्यांचे खरे भक्त आहोत म्हणून
  • माता भगीनींच्या आशिर्वाद सगळं काही देऊ जातात
  • कुठलाही मुहुर्त नसताना, उपाशीपोटी तुम्ही सभेला जमलात, हे खरे प्रेम
  • मी हिंदू म्हणूनच मरणार ही माझी हिंदुत्वाची व्याख्या
  • प्रत्येक भुमिकेला माझ्याकडे उत्तर
  • नगरची ओळख छिंदम नाही, माझा शिवसैनिक ही ओळख
  • आमचा कारभार मोकळा ढाकळा, कुठलीच गुप्त चर्चा नाही
  • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात
  • तसेच महापालिकेच्या वतीने उध्दव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.
  • नगर महापालिकेच्या अमृत अंतर्गत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन.
  • पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सहाजणांचा शिवसेनेत प्रवेश.
  • पर्यावरण मंत्री रामदास कदम भाऊ कोरगावकर आणि उपनेते अनिल राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना रामाची प्रतिमा दिली.
  • उध्दव ठाकरे यांचे सभास्थानी आगमन
  • उद्धव ठाकरे यांच्या नगरच्या सभेला सुरुवात

nagar-1

  • मी महाराष्ट्र पिंजून काढत आहे,  यावेळी कट्टर शिवसैनिक निवडून द्या
  • माझा शिवसैनिक  गोर गरीब शेतकऱ्यांच्या मदतीला  जातो.
  • महागाई,  गुंडागर्दी,  महिला अत्याचार बद्दल बोलले की देशद्रोही,  विकास के विरोधक
  • कशाला हव मी टू. मी टू ची गरज नाही. तुमच्या कडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याच्या कानाखाली वाजवा.
  • जाती पातीच्या भिंती उभ्या राहत असताना आपल्यातलं हिंदुत्व व मराठी पण बदलू नका
  • नव्या मोगलांचा सामना करायला नको का?
  • जातीपातीत हिंदुत्व, मराठीपण विसरू नका
  • धनगरांनाही  न्याय द्या
  • मराठा, धनगर, कोळी सर्व रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला मी पाठींबा दिलाय.
  • मला ते समोर आणायचं आहे
  • जनतेला ट्रेनिंग देऊन हे खोटे बोलून घेत आहेत
  • खोटं बोलून सत्ता नको
  • खोटे बोलून पाप करायचं नाही
  • कर्ज माफी झाली का? एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ झाले नाही. मग सरकारला विचारायच कोणी?
  • गट प्रमुखाने २०० घरात जाऊन  योजनेचा फायदा मिळाला का हे विचारावे
  • खरं दाबून  टाकणं  हा देशद्रोह आहे.
  • १०० टक्के शिवसेना आणि पक्ष वाढवणारच.
  • माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व दिल्ली भगवा फडकायच स्वप्न बघायच नाही का
  • तुमच्या मनात काळ बेर आहे.
  • हम मंदिर वही बनायेंगे हे खोटे बोलल्याचे तुम्ही जाहीर करा, आम्हाला काय करायच ते करतो आम्ही.
  • राम मंदिर हा देखील निवडणूकीतील जुमला होता हे देखील  सांगून टाका, मग बघतो आम्ही.
  • देशातील जनतेला खोटे बोलून तुम्ही सत्ता मिळविली. हा देशद्रोह आहे.
  • खोट बोल पण रेटून बोल असा कारभार
  • राम मंदिर मुद्दा किती काळ वाट पाहायची
  • सत्तेत राहून त्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामे करून घेईल, मी सत्तेसाठी लाचार व शेपूट हलविणारा नाही. चाबूक आेढणारा आहे
  • मी कार्यकर्ता मेळाव्याला आलोय. मला सत्तेची लालसा नाही. मला तुमची साथ हवी- उद्धव ठाकरे
  • माता भगिणींचं प्रेम सतत मिळो अशी प्रार्थना केली- उद्धव ठाकरे
  • साईबाबांच्या चरणी लीन झालो, मी सगळ्यांसाठी मागणं मागितलं.- उद्धव ठाकरे
  • साईं बाबांच्या झोळीतील पैसे काढून मोदींची सभा घेतली..रामदास कदम यांची टीका
  •  भाषणाला सुरूवात.
  • युवा शक्ती संघटनेचे प्रमुख शिवाजी चौधरी यांच्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरे यांनी भगवा ध्वज देऊन केलं स्वागत
  • साईबाबा संस्थान कंत्राटी कामगार यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.
  • ut-shirdi-swagat
  • पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार सदाशिव लोखंडे, मिलिंद नार्वेकर, रंजना नेवाळकर आदी उपस्थित
  • शिवसेना जिंदाबाद, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
  • ढोल ताशाच्या गजरात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे व्यासपीठावर आगमन.
  • ut-shirdi-stage
  • ढोलताशाच्या गजरात उद्धव ठाकरे यांचे स्वागत.
  • nagar-dhol-tasha-ut
  • नगर येथे व्यासपीठावर प्रभु श्रीरामचंद्राची 11 फूटी मूर्ती उभारण्यात आली आहे.nagar-ram-statue
  • शिर्डीत उद्धव ठाकरे यांच्या सभेला प्रचंड गर्दी
  • shirdi-ut-crowd
  • साई बाबांचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे सभांना संबोधित करणार
  • उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब घेतले साईंचे दर्शन.
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांचे साईनगरीत भव्य स्वागत.
  • shirdi-ut
  • या सभांची जय्यत तयारी झाली असून शिर्डी आणि नगर शहरात स्वागत कमानी आणि भगवे झेंडे लावण्यात आल्याने वातावरण भगवेमय झाले आहे.
  • उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार शिर्डी आणि नगरमध्ये महामेळावा
  • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आहेत.