
सामना ऑनलाईन । मुंबई
दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने प्रतिलिटर पाच रुपये थेट अनुदान द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून बेमुदत दूध बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे सारे अपडेट येथे मिळतील.
Live: आंदोलनाचे अपडेट
- दुधाच्या प्रश्नी विधानपरिषद २० मिनिटे तहकूब
- दूध अनुदानावरून विरोधकांचा विधानसभेत सभात्याग
- शालेय पोषण आहारात दुधाच्या पदार्थांचा समावेश व्हावा – सुनील प्रभू
- दूध उत्पादक शेतकऱ्यांना ५ रुपये अनुदान मिळालेच पाहिजे- शिवसेना प्रतोद सुनील प्रभू
- दूध आंदोलनाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक
- विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू
- विरोधकांनी आवाज उठवल्याने विधानसभेत गोंधळ, कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब
- दूधाच्या प्रश्नावरून विरोधक विधानसभेत आक्रमक
- आंदोलन चिघळलं जाणार नाही याची काळजी घेतली जाईल, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांची घोषणा
- दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे लक्ष द्या- अजित पवार
- खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
- LIVE: दूध रस्त्यावर… विधानसभेत चर्चेला उकळी
- मारुती मंदिरामध्ये दुधाचा अभिषेक करून आंदोलन करण्यात आले आहे
- पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गुलाबराव ढेरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं
- नगर जिल्ह्यामध्ये खासगी दूध संस्था चालकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला
- शिर्डी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

- हडपसर: सोनाई दुधाचा टँकर परत पाठवला
- वसई- विरारमध्ये अमूल दूधाच संकलन बंद
- सोलापूर: मुंबईला जाणारे दूधाचा टँकर फोडला
- जालन्यात दूध अंदोलन पेटलं, दूधाच्या गाड्या अडवल्या
- संभाजीनगर: लाडसांगवी मध्ये दूध अंदोलन सुरू
- श्रीरामपूर: कारेगावात शेतकऱ्यांचं अंदोलन सुरू
- नगर जिल्ह्यातून दूध बाहेर जिल्ह्यामध्ये गेले नाही
- नगर जिल्ह्यात रात्रीपासूनच स्वतःहून डेरी चालकांनी दूध न घालण्याचा निर्णय घेतला
























































