सुषमा स्वराज अनंतात विलीन, शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी परराष्ट्रमंत्री, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्या 67 वर्षांच्या होत्या. विदेशात संकटामध्ये अडकलेल्या हिंदुस्थानी नागरिकांची सुटका करून आईच्या मायेने मायदेशी आणणाऱया सुषमा स्वराज यांची ओळख ‘सुपरमॉम’ अशी होती. सुषमा स्वराज यांच्या निधनाने अवघा देश हळहळला आहे. सर्वत्र शोक व्यक्त होत आहे.

  • सुषमा स्वराज अनंतात विलीन
  • सुषमा स्वराज यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, यांनी वाहिली श्रद्धांजली

  • शरद यादव, रामदार आठवले, गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत यांनी वाहिली स्वराज यांना श्रद्धांजली
  • शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सुषमा स्वराज यांना वाहिली श्रद्धांजली
  • मुलगी बांसुरी करणार अंत्यविधी

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित

  • देशभरातील व परदेशातील नेते लोढी स्मशानभूमीत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित
  • मंत्रोपचारात सुषमा स्वराज यांच्यावर अंत्यविधीला सुरुवात
  • सुषमा स्वराज यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

ul>

  • सुषमा स्वराज यांचे पार्थिव लोढी स्मशानगृहाकडे रवाना
  • सुषमा स्वराज यांचे पार्थिव तिरंग्यात लपेटले

  • सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल आणि मुलगी बांसुरी कौशल यांनी दिली मानवंदना

  •  थोड्याच वेळात सुषमा स्वराज यांच्यावर होणार अंत्यसंस्कार
  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतले पार्थिवाचे अंत्यदर्शन

  • अंतिम दर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी
  • सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात पोहोचले
  • सुषमा स्वराज यांच्या मदतीने पाकिस्तानातून परतलेल्या मूक बधीर गीताने वाहिली श्रद्धांजली

  • थोड्याच वेळात सुषमा स्वराज यांचे पार्थिव भाजप मुख्यालयात पोहोचणार
  • राज्यसभेत सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली
  • राहुल गांधी यांनी घेतले सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

  • जम्मू कश्मीरचे राज्यपाल यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनावर शोक व्यक्त केला

  • हरयाणा सरकारने दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली

Video- सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहताना मोदींना अश्रू अनावर झाले

 

  • पंतप्रधानांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी पोहोचले
  • समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांनी घेतले सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन

  • सुषमा मला आईसारख्या आहेत, त्या माझ्या हृदयात कायम राहतील.

  • पाकिस्तानातून सुषमा स्वराज यांच्यामुळे सुखरूप हिंदुस्थानात परतलेल्या हमीद अन्सारीची प्रतिक्रिया
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले

  • सुषमा या देशातील तमाम महिला नेत्यांसाठी आदर्श व्यक्तिमत्व होते-आडवाणी

  • भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सुषमा स्वराज यांना आदरांजली वाहिली
  • दिल्लीमध्ये दोन दिवस दुखवटा पाळला जाणार

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे ट्विट
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याचवेळात सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेणार
  • सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे भाजपने सुरू केलेल्या महाजनादेश यात्रेचे आजचे कार्यक्रम रद्द करण्यात आले
  • पार्थिवाच्या दर्शनासाठी भाजप नेत्यांची रीघ
  • स्वराज यांचे पार्थिव निवासस्थानी आणले

  • दुपारी 3 वाजता होणार राजकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • 12 ते 3 वाजेपर्यंत पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवणार
  • सुषमा स्वराज यांचे पार्थिव आज 12 वाजता भाजप कार्यालयामध्ये नेण्यात येणार
  • आज 11 वाजता धवलदिप बिल्डिंगमध्ये ठेवणार पार्थिव

  • सुषमा स्वराज यांचे पार्थिव निवासस्थानी नेण्यात येत आहे

  • सुषमा स्वराज यांचे पार्थिव आज रात्री त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार

  • सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले

  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह एम्स रुग्णालयात पोहोचले

  • सुषमा स्वराज यांंचे निधन

  • थोड्याच वेळात एम्स रुग्णालय मेडिकल बुलेटिन जारी करणार
  • पाच डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतील लक्ष ठेऊन
  • केंद्रीय राज्यमंत्री एस एस अहलूवालिया रुग्णालयात पोहोचले
  • केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रुग्णालयात दाखल

  • रात्री 9 च्या सुमारास त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले
  • दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये दाखल
  • सुषमा स्वराज यांची तब्येत बिघडली