पुणे विभागातून 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना घेऊन 107 विशेष रेल्वेगाडया रवाना – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

408

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर व आसाम राज्यामधील 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना घेऊन पुणे विभागातून 22 मे 2020 अखेर 107 विशेष रेल्वेगाडया रवाना झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 51, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 21, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी 4 , छत्तीसगडसाठी 4 , जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरासाठी 1, आसामसाठी 1 अशा एकूण 107 रेल्वेगाडया 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत. या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या