लोहा नगरपालिकेत भाजप आघाडीवर, हाताला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लोहा

काँग्रेसच्या हाती असलेल्या लोहा नगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार आघाडी घेतली असून 13 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे अवघे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. नगराध्यक्ष पदासाठी लढणाऱ्या 4 जणांपैकी भाजपचा उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे लोहामध्ये भाजपची सत्ता येण्याची चिन्ह आहेत.

लोहा नगरपालिकेच्या 17 नगरसेवक पदांसाठी ५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते. रविवारी लोहातील मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला. यावेळी 80 टक्के मतदान झाले.

लोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी, काँग्रेसकडून सोनू उर्फ व्यंकटेश संगेवार, बहुजन विस्थापित आघाडीकडून रमेश माळी तर अपक्ष म्हणून शिवाजी अंबेकर हे आहेत. भाजपच्या गजानन सूर्यवंशी यांना आघाडी मिळाल्याचे चित्र आहे.