
सामना ऑनलाईन । मुंबई
नवी दिल्लीमध्ये विज्ञान भवनात राज्य निवडणूक आयोगाची आज सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये आगामी निवडणुकांचे वेळापत्रकर जाहीर होण्याची शक्यता आहे. तारखा जाहीर होताच आचारसंहिता लागू होईल. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये एनडीएचे बहुमताचे सरकार आले होते.
2014 ला निवडणूक आयोगाने 5 मार्चला निवडणुकांची घोषणा केली होती. एकूण 9 टप्प्यांमध्ये 16 व्या लोकसभेसाठीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. 7 एप्रिल ते 12 मे या काळात या निवडणुका झाल्या होत्या आणि 16 मे रोजी निकाल लागले होते. महाराष्ट्राचा विचार केल्यास 48 जागांसाठी एकूण तीन टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या.
> पहिला टप्पा – 10 एप्रिल रोजी घेण्यात आला होता, त्यामध्ये 10 जागांवर निवडणूक झाली.
> दुसरा टप्पा – 17 एप्रिल रोजी 19 जागांसाठी पार पडला.
> तिसरा टप्पा – 24 एप्रिल रोजी 19 जागांसाठी तिसरा टप्पा पार पडला होता.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
- भारतीय जनता पक्ष – 23 जागा
- शिवसेना – 18 जागा
- राष्ट्रवादी काँग्रेस – 4 जागा
- काँग्रेस – 2 जागा
- स्वाभिमानी पक्ष – 1 जागा
























































