विरोधकांचं डिपॉझिट जप्त होईल असा विजय पाहिजे – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायगड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार खासदार अनंत गिते यांच्या प्रचारार्थ माणगाव येथे जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन केले. यावेळी त्यांना विरोधकांची चांगलीच पिसे काढली.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

  • मला रायगडात विरोधकांच डिपॉझिट जप्त होईल असा विजय पाहिजे – उद्धव ठाकरे
  • धनुष्यबाणाला मत म्हणजे तुमचं स्वत:च्या विकासाला मत आहे – उद्धव ठाकरे
  • तुमचं मत म्हणजे पूर्ण देश आहे. म्हणून प्रत्येक मताची किंमत म्हणजे सरकार असते – उद्धव ठाकरे
  • छत्रपतींनी अफजल खानाचा वध केला, शाहिस्तेखानाची बोटं तोडली. आजही ”छत्रपती शिवाजी महाराज की जय” असे म्हटले की अंगावर रोमांच उभे राहतात – उद्धव ठाकरे
  • शरद पवारांना राहुल गांधी, राहुल गांधीला शरद पवार, ममतांना मायावती आणि मायावतींना अखिलेश पंतप्रधान चालेल का? – उद्धव ठाकरे
  • राहुल गांधींच्या आजीने ”गरिबी हटाव”ची घोषणा केली, त्यांच्या घरातल्यांची हटली पण गरिबांचे काय? – उद्धव ठाकरे
  • काँग्रेस-राष्ट्रवादी एवढी वर्षे सत्ता भोगून माजले, ते पाच वर्षात सुधारणार नाही – उद्धव ठाकरे
  • निवडणूक आल्यावर शेतकरी आठवला, दुष्काळ आठवला, शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? – उद्धव ठाकरे
  • जो कोणी हा देश आपला स्वतःचा देश समजतो, तो मुसलमान असला तरी आपला आहे, ही आम्हाला दिलेली शिकवण आहे – उद्धव ठाकरे
  • बाकी आपले भाई जयंत पाटील, जयंत पाटलांना मी सांगतो की तुम्ही सुद्धा आपल्या रायगडच्या मातीशी इमान राखा – उद्धव ठाकरे
  • हा रायगड जिल्हा आहे, रायगड म्हटलं की शिवराय आलेचं. शिवरायांना वंदन केल्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही – उद्धव ठाकरे
  • सभास्थळी प्रचंड गर्दी

mangaon

  • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
  • उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन

mangaon1