
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडीक यांचा 270568 मतांनी पराभव केला.
या मतदारसंघात चंदगड, राधआनगरी, कागल, कोल्हापूर साऊथ, कोल्हापूर नॉर्थ आणि करवीर ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने बाजी मारली होती. 2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय महाडीक यांनी विजय मिळवला होता. त्यांना 6,07,665 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक शिवसेनेचे संजय मंडलीक यांना 5,74,406 मतं मिळाली होती.
2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे अपक्ष उमेदवार सदाशिव मंडलीक यांनी विजय मिळवला होता. सदाशिव मंडलीक यांना 4,28,082 मतं मिळाली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार छत्रपती संभाजीराजे शाहू यांना 3,83,282 मतं मिळाली होती आणि शिवसेना उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिला होता.


























































