Lok Sabha Election 2024 : अजित पवारांचा अर्ज बाद, बारामतीत नणंद-भावजयमध्ये होणार लढत

बारामती लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबात थेट सामना होईल. या निवडणुकीसाठी सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार यांनीही अर्ज दाखल केला होता. मात्र निवडणूक आयोगाच्या छाननीमध्ये हा अर्ज बाद झाला आहे.

बारामतीतून यंदा लोकसभेवर कोण जाते याकडे राज्याचे लक्ष आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि अजित पवार गटानेही कंबर कसली आहे. अजित पवार बारामतीत शड्डू ठोकून बसले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांनीही भेटीगाठी आणि सभांचा तडाखा लावला आहे.

बारामती मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. येथून सुप्रिया सुळे यांनी आधी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासोबत अजित पवार यांनी अर्ज दाखल केला. अजित पवार यांनी डमी अर्ज भरला होता. मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास पक्षाकडून उमेदवार देता यावा यासाठी असे केले जाते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही सचिन दोडके यांनी डमी अर्ज भरला होता.

अजित पवार बारामतीतच अडकले, भाजपने त्यांना लोकल नेता केले; रोहित पवार यांचे टिकास्त्र

निवडणूक आयोगाच्या अर्ज छाननीमध्ये सचिन दोडके आणि अजित पवार यांचा अर्ज बाद झाला आहे. तर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांचा अर्ज मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांच्यात थेट लढत होणार आहे. तसेच याच मतदारसंघात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अपक्ष उमेदवार शरद राम पवार यांनीही अर्ज भरला होता आणि त्यांचाही अर्ज मंजूर झाला आहे.

Lok Sabha Election 2024 : मोदींनी विरोधकांवर तीर सोडला, लागला मात्र अशोक चव्हाणांना; कार्यकर्तेही अवघडले