
सामना प्रतिनिधी । नगर
कोणाकडे कितीही यंत्रणा असू द्या, साधन सामुग्री असू द्या, समोरच्या उमेदवाराचा बाऊ करण्यापेक्षा आपण आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी फक्त भाषणबाजी करण्यापेक्षा प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये मताधिक्य कसे मिळेल हे पहा, सगळे मतभेद विसरुन कार्यकर्त्यानी एक दिलाने काम केले तर निश्चित यश मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे यांनी केले.
नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा शुक्रवारी नगर येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आमदार राहुल जगताप, आमदार संग्राम जगताप, आमदार वैभव पिचड, आमदार अरुण जगताप, माजी अमादार दादाभाऊ कळमकर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, नेरेद्र घुले, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, विठ्ठल लंघे, अरुण कडू, घनश्याम शेलार, सुजीत झावरे, पाडुरंग आभंग, मजुषा गुंड आदींसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
























































