
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य टोळीला युनिट चारने अटक केली. त्यांच्याकडून घातक शस्त्रासह दुचाकी जप्त करण्यात आली आहे. शांतीनगर झोपडपट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली.
अक्षय विक्रम आरडे (वय 19, रा. भोसरी), अंत्रोस गोंदेलाल पवार (वय 40), आकीलाल साकीलाल पारधी (वय 25), बियरलाल मनीबेज राजपुत (वय 25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
युनिट चारचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खडकीतील शांतीनगर परिसरातील रिक्षामध्ये काहीजणांची संशयास्पद हालचाल पथकाला दिसून आली. पथकाने सापळा रचून अक्षय आरडे, अंत्रोस गोंदेलाल, आकीलाल पारधी, बियरलाल राजपुत यांना ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार पसार झाले. आरोपी हे मुळचे मध्यप्रदेश कटनी येथील आहेत. त्यांनी शहर आणि परिसरात गंभीर स्वरुपाचे गुन्हे केल्याची शक्यता आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, एपीआय विकास जाधव, उपनिरीक्षक जयदीप पाटील, महेंद्र पवार, राजस शेख, नागेशसिंग कुंवर, प्रविण भालचीम, प्रविण कराळे, संजय आढारी, स्वप्निल कांबळे, विनोद महाजन, कौस्तुभ जाधव, सारस साळवी, रमेश राठोड, अशोक शेलार, वैशाली माकडी, शितल शिंदे यांनी केली.
दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास करण्यात येत आहे.
– जयंत राजूरकर, पोलीस निरीक्षक, युनिट चार
























































