
पालिकेच्या माध्यमातून विहार जलशुद्धीकरण केंद्रातील 1200 मिली मीटर फिल्टर बायपास जलवाहिनी 1200 मिली मीटर जलशुद्धीकरण पाण्याच्या वाहिनीला जोडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम 5 एप्रिल दुपारी 12 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेच्या एल वॉर्ड कुर्ला विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
पालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या कामामुळे बिट क्रमांकः 160 (अंशतः) मध्ये गुरूनानक नगर, गैबन शाह दर्गा रोड, सलमा कंपाऊंड, एन. एस. एस. मार्ग येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बिट क्रमांकः 160 (अंशतः) मध्ये शिवाजी नगरमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बिट क्रमांकः 163 मध्ये संपूर्ण काजूपाडा, सुंदरबाग गल्ली, इंदिरा नगर, गणेश मैदान, बुद्धपर्ण कुटीर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बिट क्रमांकः 164 मध्ये प्रीमियर रोड काळे मार्ग ते ब्राह्मणवाडी, कोहिनूर सिटी, नौपाडा, राजू बेडेकर मार्ग, लाल बहादूर शास्त्र्ााr मार्ग (एल. बी. एस. मार्ग), कमानी येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बिट क्रमांकः 165 मध्ये ख्रिश्चन गाव, जय अंबिका नगर, भारतीय नगर, हलाव पूल, कोहिनूर रुग्णालय, मसरानी गल्ली, लाल बहादूर शास्त्र्ााr मार्ग (एल. बी. एस. मार्ग) (अंशतः), पाईप मार्ग येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बिट क्रमांकः 166 मध्ये एम. एन. मार्ग, लाल बहादूर शास्त्र्ााr मार्ग (एल. बी. एस. मार्ग), क्रांती नगर, संदेश नगर, वाडिया वसाहत, किस्मत नगर, शांती नगर येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बिट क्रमांकः 167 मध्ये विनोबा भावे नगर, बुद्ध वसाहत, ब्राह्मणवाडी, ‘एल’ विभाग कार्यालय, एस. जी. बर्वे मार्ग, न्यू मिल मार्ग येथे कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.































































