
पालिकेच्या माध्यमातून आज लोअर परळमधील 21 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला. या कारवाईत 56 बेवारस वाहनांवरही कारवाई करण्यात आली. शिवाय 87 बेवारस वाहनांना हटवण्यातकरीता पालिकेने नोटीस बजावल्या असल्याची माहिती जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी दिली. लोअर परळ येथील रेल्वे परिसरात, सीताराम जाधव, एम. भोसले मार्ग, ना. म. जोशी मार्ग या रस्त्यावर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर विविध विभागाची संयुक्त कारवाई केली. यात 21 अनधिकृत शेड, 36 लाकडांचे बाकडे व 4 अनधिकृत स्टॉल हटवण्यात आले.
































































