Madam chief minister – मैं कुंवारी हूं, तेज कटारी हूं, लेकिन सिर्फ तुम्हारी हूं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री ऋचा चड्ढा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या बहुचर्चित ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘मैं कुंवारी हूं, तेज कटारी हूं, लेकिन सिर्फ तुम्हारी हूं’, असे म्हणत ऋचा थेट जनतेमध्ये जाऊन मुख्यमंत्री बनण्यास तयार असल्याचे सांगते.

‘मॅडम चीफ मिनिस्टर’ चित्रपटाची कथा एका अशा मुलीची जी ना कोणासमोर झुकते, ना कोणाच्या दबावात काम करते. स्वत:वर विश्वासच ठेऊन ती सत्ता मिळवते आणि शिखरावर पोहोचते. ऋचा चड्ढा प्रमुख भूमिकेत आहे, तर सुभाष कपूर यांनी दिग्दर्शन केले आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच चाहत्यांनी यावर उड्या घेतल्या आहेत.

ऋचा चड्ढा हिने पहिल्यांदाच एखादी आव्हानात्मक भूमिका साकारल्याचे ट्रेलर पाहताच लक्षात येते. तसेच राजकारण अतुच्य पातळीवर पोहोचले असून सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचेही दिसते. जागावाटपावरूनही होणारे राजकारणही यात आपल्याला पाहता येणार आहे. तसेच समाजाने शोषण केलेल्या एक दलित मुलगी पुढे येते आणि स्वत:च्या बळावर मुख्यमंत्री बनते असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

22 जानेवारीला होणार प्रदर्शित

चित्रपटात ऋचा चड्ढा हिच्याव्यतिरिक्त सौरभ शुक्ला आणि मानव कौलही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 22 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

पाहा ट्रेलर