जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत माधुरी सावगावे यांचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याच्या मुदतीत सोसायटी महिला प्रतिनिधी गट, ग्रामपंचायत अनुसूचित जाती गट, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल गट, व्यापारी व अडते गट आणि हमाल तोलाई गटातील अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे या गटांची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या सौ माधुरी सावगावे या रणरागिणीची बिनविरोध निवड झाल्याने गद्दारांच्या मतदारसंघात विजयाची पहिली मशाल पेटवल्याबद्दल माधुरी सावगावे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

यावेळी कुरुंदवाड येथील शिवसेना शहर कार्यलयात झालेल्या आनंदोत्सवात विजयाचे प्रमुख शिल्पकार उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटिल, माजी जिल्हा प्रमुख अप्पासो भोसले, माजी नगरसेवक राजू आवळे, उपतालुका प्रमुख युवराज घोरपडे, तेरवाडचे माजी सरपंच संजय अनुसे यांचा विशेष सत्कार करण्यात आला यानंतर शिवसेना शिरोळ तालुक्याच्या वतीने बाजार समितीच्या नवनिर्वाचित सदस्या सौ माधुरी सावगावे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालूका प्रमुख वैभव उगळे, महिला तालुका संघटिका वैशाली जुगळे, शहर प्रमुख बाबासो सावगावे, माजी उपनगराध्यक्ष दयानंद मालवेकर, तेरवाड सरपंच संजय आणूसे, रामभाऊ मोहिते, सुरेश बिंदगे, सुहास पासोबा, महिला शहर संघटिका राजश्री मालवेकर, राजू बेले, नजीर मखमल्ला, आयुब पट्टेकरी, अनिकेत बेले, आदी प्रमुख उपस्थित होते. बाजार समितीत राजर्षि शाहू शेतकरी विकास आघाडीचे सात उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर सोसायटी गट, सोसायटी इतर मागासवर्गीय प्रतिनिधी, सोसायटी भटक्या जाती व जमाती आणि ग्रामपंचायत सर्वसाधारण या गटातील ११ जागांसाठी २१ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. शुक्रवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप होवून यादी प्रसिद्ध करण्यात येईल.