
मध्य प्रदेशमध्ये भाजप कार्यालयात दोन महिलांशी छेडछाड झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील दोन महिलांनी भाजप कार्यालयात आपल्याशी छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. या महिला म्हणाल्या आहेत की, ‘हा सर्व प्रकार भाजप कार्यालयाच्या ग्रंथालयमध्ये घडला आहे.’
मध्य प्रदेशम काँग्रेसनेही हा व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे. असे असले तरी या महिलांनी अद्याप याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली नाही.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार आरोप करणारी महिला म्हणाली की, एका वयस्कर भाजप कार्यकर्त्याने त्यांच्यासोबत छेडछाड केली. या महिलेने आपल्या मैत्रिणींसोबतही असाच प्रकार घडल्याचा आरोप केला आहे. या व्हिडीओत ही दुसरी महिलाही दिसत आहे. या व्हिडीओबद्दल बोलताना भाजपच्या स्थानिक नेत्याने सांगितलं की, या व्हिडीओची सत्यता तपासली जात आहे.
काँग्रेसने मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना केलं लक्ष्य
हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत मध्य प्रदेश काँग्रेसने ट्विटरवर लिहिलं की, ‘भाजप कार्यलयात लैंगिक शोषण, भाजपच्या कृतीने मध्य प्रदेश बदनाम. आमदार खरेदी करून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राज्यात दररोज 15 मुलींवर अत्याचार आणि 16 मुलींच्या अपहरणाच्या आकड्यांनंतर भाजप कार्यालयात लैंगिक शोषणाची बातमी लाजिरवाणी आहे.’
बीजेपी कार्यालय में यौन शोषण,
बीजेपी की हरकतों से मध्यप्रदेश शर्मसार;विधायक ख़रीदकर मुख्यमंत्री बने शिवराज के राज में रोज 15 बेटियों से दुष्कर्म और 16 बेटियों के अपहरण के आँकड़ों के बाद बीजेपी दफ़्तर में यौन शोषण की ये खबर लज्जित करती है।
शिवराज जी,
बीजेपी से बेटी बचाओ। pic.twitter.com/MmBRaqTIC3— MP Congress (@INCMP) March 19, 2021



























































