
मॅजिकपिन या देशातील सर्वात मोठय़ा हायपरलोकल शॉपिंग आणि सेव्हिंग प्लॅटफॉर्मने 2 हजार स्थानिक स्टोअरमधून देशातील 15 शहरांमध्ये सर्वात वेगवान 45 मिनिटांत फार्मसी डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. मुंबईसह दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, कोलकाता, पुणे, चेन्नई, हैदराबाद, गुडगाव, नोएडा, फरिदाबाद, गाझियाबाद, जयपूरमध्ये ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. औषधांचा विचार केला जातो त्यावेळी वेळ हीच सर्वात किमती असते. त्यामुळे वेगाने आणि तत्परतेने सेवा देण्यासाठी ही फॉर्मसी सुरू केली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.


























































