
देशात गगनाला भिडलेली महागाई कमी व्हावी, बेरोजगारीच्या समस्येला आळा बसावा, कोरोना महामारी समूळ नष्ट व्हावी म्हणून शिवसेना उद्या शनिवारी हनुमानाला साकडे घालणार आहे. त्यासाठी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्गावरील पुरातन श्री हनुमान मंदिर येथे सायंकाळी 6 वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे.
दादर पश्चिम येथील न. चिं. केळकर मार्गावर पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर आहे. या मंदिराची स्थापना प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने झाली आहे. हनुमान जयंतीनिमित्त या पुरातन मंदिरात उद्या शनिवारी सायंकाळी 6 ते 7 या वेळेत लोकाग्रहास्तव शिवसेनेने महाआरतीचे आयोजन केले आहे. वाढलेली महागाई, बेरोजगारी कमी व्हावी, कोरोनाचे संकट नष्ट व्हावे म्हणून हनुमानाला साकडे घालण्यात येणार असल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे.
























































