भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू, माजी मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेवर रविवारी सुनावणी झाली. सत्तास्थापन करण्यासाठी निमंत्रण देण्याचा निर्णय कोणत्या कागदपत्रांच्या आधारे घेतला यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी न्यायालयाने भाजपला उद्या 10.30 वाजेपर्यंत वेळ दिला आहे. यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालींनी वेग आला असून आमदार फुटू नये यासाठी तिन्ही पक्ष काळजी घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांचे स्थान बदलले असून त्यांनी आता ग्रँड हयातमध्ये ठेवले आहे, काँग्रेसचे आमदार जे.डब्लू मॅरिएट आणि शिवसेनेचे आमदार हॉटेल ललितमध्ये आहेत. याच दरम्यान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.

अजित पवारांचे वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे! शरद पवारांचे स्पष्टीकरण

न्यायालयातील सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजप सर्वोच्च न्यायालयाकडून अतिरिक्त वेळ घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामागील त्यांचे कारस्थान तुम्ही समजू शकता. ते अन्य पक्षांच्या आमदारांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, भाजपकडून कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना ग्रँड हयातमध्ये हलवले आहे. तर दुसरीकडे आमदारांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुशीलकुमार शिंदे आणि मल्लिकार्जुन खरगे जे.डब्ल्यू मॅरिएट हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत.

#MahaPoliticalTwist सर्वोच्च न्यायालयात काय घडले वाचा एका ‘क्लिक’वर

आपली प्रतिक्रिया द्या