अजित पवारांचे वक्तव्य खोटे आणि दिशाभूल करणारे! शरद पवारांचे स्पष्टीकरण

sharad-pawar

भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय याआधीच घेतलेला आहे. अजित पवारांचे विधान खोटे आणि दिशाभूल करणारे असून लोकांमध्ये संभ्रम आणि चुकीची प्रतिमा निर्माण करणारे आहे, असे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी एकामागोमाग एक ट्वीट करून मोदी, शहा यांच्यासह भाजप नेत्यांचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी मी राष्ट्रवादीसोबत असून शरद पवारच आपले नेते आहेत, असे ट्वीट केले. तसे भाजप आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राला पुढील 5 वर्षे टिकणारे स्थिर सरकार देईल, असेही त्यांनी म्हटले.

तसेच घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. सर्व काही ठिक आहे. फक्त थोडा धिर धरा. तुमच्या पाठिंब्याबाबत धन्यवाद, असे दुसरे ट्वीट अजित पवार यांनी केले. या ट्वीटमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला. परंतु काही वेळातच शरद पवार यांनी ट्वीट करून अजित पवार यांच्या विधानाची चिरफाड केली आहे.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवारांचे पहिले ट्वीट, बंड मागे न घेण्याचे संकेत?

आपली प्रतिक्रिया द्या