Lok Sabha 2019 किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर भवानी माँ लढणार निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लखनौ

नुकत्याच पार पडलेल्या कुंभ मेळ्यात यंदा किन्नर आखाड्याला देखील स्थान देण्यात आले होते. या आखाड्यातील महामंडलेश्वर भवानी माँ या आगामी लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांना आप पक्षाकडून उत्तर प्रदेशमधील प्रयागराज मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले आहे.

आपचे खासदार संजय सिंह यांच्या उपस्थितीत महामंडलेश्वर भवानी माँ यांनी आपमध्ये प्रवेश केला. ”किन्नर समाज हा राजकारणात आतापर्यंत उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना साथ देण्याचे ठरवले आहे. मोदी सरकारला किन्नरांना भिकाऱ्यांच्या कॅटेगरीतच ठेवायचे आहे.”असे यावेळी सिंह यांनी सांगितले.