सीएनजी आणि पीएनजीची पुन्हा दरवाढ, वाचा काय आहेत नवीन दर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महानगर गॅस लिमिटेडने पुन्हा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल डिझेलने शंभरी गाठल्यानंतर अनेक लोकांनी आपला मोर्चा सीएनजी गाड्यांकडे वळवला होता. तुलनेने स्वस्त असल्यामुळे लोक सीएनजी गाड्यांना प्राधान्य देत होते. परंतु पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीदेखील आता वाढीव दरात मिळणार आहे.

महानगर गॅस लिमिटेड कंपनीने एक परिपत्रक जारी केलं असून त्यात वाढलेले दर नमूद करण्यात आले आहेत. कच्च्या नैसर्गिक वायूच्या दरात आणि त्यावरील प्रक्रिया शुल्कात झालेल्या वाढीमुळे अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅसतर्फे जाहीर करण्यात आलं आहे.

आता नवीन दरांनुसार सीएनजी हा 6 रुपयांनी वाढला असून पीएनजी हा 4 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही गॅसचे वाढीव दर अनुक्रमे 86 रुपये प्रति किलो आणि 52.50 रुपये असे होणार आहेत. ही दरवाढ 2 ऑगस्ट 2022 च्या मध्यरात्रीपासून मुंबई आणि परिसरात लागू करण्यात आली आहे.