महानगर गॅस लिमिटेडचा पुन्हा दणका; सीएनजी 5 तर पीएनजी 4.50 रुपयांनी महागला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्राने 1 एप्रिलपासून नॅचरल गॅस डोमेस्टीकली प्रोडक्शन कॉस्ट 110 टक्के वाढविल्याने त्यामुळे रि-गॅसिफाईड एलएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात किलोमागे 5 रूपये तर आणि पीएनजीच्या दरात प्रति घन मीटर 4.50 रूपयांची वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात 12 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून सर्व कर धरून (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) सीएनजीचा दर किलोमागे 72 रूपये तर (डोमेस्टिक पाईप नॅचरल गॅस) पीएनजीचा दर 45.50 रूपये इतका होणार आहे.

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि डोमेस्टीक पीएनजी कस्टमरना दरवाढीची झळ पोहचू नये याची काळजी घेत असते. परंतू आंतरराष्ट्रीय बाजारातच नॅचरल गॅस किंमत वाढली आहे. तरीही सीएनजीच्या वापरामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वापरापेक्षा अनुक्रमे 59 टक्के आणि 31 टक्के बचत होत आहे. डोमेस्टिक पीएनजीचा सध्याचा दर डोमेस्टिक एलपीजीपेक्षा कमी असल्याचे महानगर गॅस लिमिटेड कंपनीने म्हटले आहे.