महानंदच्या दुधाचा दर वाढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमूलसह राज्यातील सर्वच खासगी आणि सहकारी दूध डेअर्‍यांनी दुधाच्या विक्री दरात वाढ केल्यानंतर आता महानंद डेअरीही विक्री दरात दोन रुपयांची वाढ करणार आहे. ही वाढ आठवडाभरात लागू होणार आहे. दुधाचा पुरवठा घटल्याने शेतकर्‍यांकडून खरेदी केल्या जाणार्‍या प्रतिलिटर दुधाचा दर 30 रुपयांवर गेला आहे. तसेच स्थानिक पातळीवरील दूध संकलन आणि वाहतुकीवर सुमारे तीन रुपये खर्च होत आहेत. त्यामुळे डेअरीवरील आर्थिक भार वाढू लागला आहे. तसेच इतर सर्व संघांना आपल्या दुधाच्या दरात दोन रुपयांनी वाढ करत 46 रुपये केला आहे. त्यापार्श्वभूमीवर महानंद डेअरीनेही आपल्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी गुरुवारी 19 डिसेंबरला पणन समितीची बैठक होणार असल्याची माहिती डेअरीचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी दिली.