
सामना ऑनलाईन । मुंबई
क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) ने प्रशिक्षणासह अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या निवडीचे शिबीर 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या काळात पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे आयोजित केले होते. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून 40 पूर्णपणे आणि काही अंशतः अंध खेळाडू सहभाग घेतला.
तीन दिवस चाललेल्या या शिबिरातून महाराष्ट्र संघाची निवड डब्ल्यूबीसीसी (वर्ल्ड अंध क्रिकेट परिषद) आणि सीएबीआय (क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया) याच्या नियमांतर्गत केली गेली. संध पुढील प्रमाणे असेल स्वप्नील वाघ (संघप्रमुख), सुनील राठोड (उप संघप्रमुख), अमोल खर्चे, अनिल बेलसरे, प्रवीण कारलुके, निलेश नानारे, उत्तम मरगज, राहुल महाले, अनिल येती, अभिजित शिरतोडे, अभिजित धोडे, विनोद महाले, उमेश जाधव, विकास खिल्लारे तर सुशील पाटील, संदीप जाधव, दिनेश धांडे हे राखीव खेळाडू असतील.





























































