
राज्यात बुधवारी दिवसभरात 16 हजार 715 रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा 11 लाख 96 हजार 441वर पोहोचला आहे. 14 हजार 578 नवीन रुग्णांची नोंद झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80.81 टक्यांवर पोहोचले आहे. सध्या 2 लाख 44 हजार 527 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात बुधवारी 355 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आह़े आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 73 लाख 24 हजार 188 नमुन्यांपैकी 14 लाख 80 हजार 489 नमुने पॉझिटिव्ह ( 20.21टक्के) आले आहेत.
मुंबईत दिवसभरात 2,848 कोरोना रुग्ण, 2,257 कोरोनामुक्त, 46 जणांचा मृत्यू
मुंबईत बुधवारी दिवसभरात 2,848 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत एकूण 2,257 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 83,742 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 46 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 46 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 9 हजार 245 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 67 दिवसांवर पोहोचला आहे.




























































