‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेला वाढत्या तापमानाचा फटका, सकाळच्या सत्रातील सामने रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या तापमान प्रचंड वाढले असून याच वाढत्या तापमानामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा अडसर निर्माण झाला आहे. साताऱ्यातील पारा चाळीशी पार गेल्याने त्यामुळे सकाळच्या सत्रातील सामना रद्द करण्यात आले आहेत. सकाळच्या सत्रातील हे सामने आता सायंकाळी पाच वाजल्यानंतर खेळवले जाणार आहेत.

उपमहाराष्ट्र केसरी भगत सलामीलाच गारद 

महाराष्ट्र केसरीची रंगत शिगेला पोहोचली असताना वाढत्या तापमानाच फटका या स्पर्धेला बसला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला असून बुधवारी साताऱ्यात दुपारचे तापमान 40 अंशापर्यंत गेले होते. वाढत्या तापमानाचा त्रास काही कुस्तीपटूंना झाला. या पार्श्वभूमीवर आयोजकांनी सकाळच्या सत्रात अर्थात 8 ते 10 या काळात होणारे सामने रद्द करून हे सामने दुसऱ्या सत्रात अर्थात पाचनंतर घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोणत्याही खेळाडूला उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी आयोजकांकडून ही खबरदारी घेण्यात आली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबत माहिती दिली आहे.