
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची मानाची समजली जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद नगरला मिळाले आहे. कुस्तीगीर परिषदेचे महासचिव बाळासाहेब लांडगे यांनी रविवारी ही घोषणा केली. नगरचे आमदार संग्राम जगताप यांनी 66व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या यजमानपदाचे शिवधनुष्य उचलले आहे.
पुण्यातील मामासाहेब कुस्ती संकुलात कार्यकारीची बैठक पार पडली. या बैठकीत नगरला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे यजमानपद देण्याची प्राथमिक घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या यजमानपदासाठी पुणे जिल्ह्यातील वेल्हा आणि ठाणे शर्यतीत होते. मात्र, यात नगर शहराला पसंती देण्यात आली.






























































