एक दोन तीन चार… गोविंदा हुश्शार! तिसरी लाट टाळण्यासाठी यंदा घागर उताणीच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘सण, उत्सवांना काही काळ आवर घालून जनतेचे प्राण वाचवायला महाराष्ट्राने प्राधान्य दिले असा संदेश आपण सर्व मिळून जगाला देऊ’, अशा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला मुंबईसह महाराष्ट्रातील गोविंदा मंडळांनी आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी त्यांनी भव्य स्वरूपात दहीहंडी साजरी केली नाही. कृष्ण जन्माष्टमीचा पारंपरिक उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला गेला. केवळ परंपरा म्हणून दहीहंडी बांधून कृष्णरूपातील गोविंदाने काठीच्या सहाय्याने ती पह्डण्याची औपचारिकता पार पाडली. गोविंदा म्हणजे एकतेचे, संघटित प्रयत्नांचे प्रतीक. कोरोनाला लगाम घालण्यासाठीही अशा संघटित प्रयत्नांचीच गरज आहे हे गोविंदा मंडळांनी दाखवून दिले.

जबरदस्तीने दहीहंडी साजरी करणारे स्वतःच हंडी फोडणार

कोरोना परिस्थितीचे भान न राखता दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा अतिरेकी निर्णय घेतलेल्या राजकीय पक्षांवरही गोविंदा मंडळांनी टीका केली आहे. दहीहंडी पह्डण्यासाठी मानवी मनोरे उभारण्यासाठी सराव आवश्यक असतो. यावर्षी कोणत्याही गोविंदा पथकाने सराव केलेला नाही. मग यांच्या हंडय़ा फोडणार कोण? कदाचित बांधणाऱयांनाच त्या फोडाव्या लागतील, अशी प्रतिक्रिया गोविंदा मंडळांनी दिली आहे.

सरकारच्या मार्गदर्शक सूचना

– दहीहंडीनिमित्त निर्बंधांत कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करावा. कोणत्याही प्रकारे सार्वजनिक पूजा-अर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये. प्रतीकात्मक रूपात उत्सव साजरा करावा. पूजा-अर्चा तसेच कार्यक्रमांचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण करावे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता गर्दी टाळावी. दहीहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये.

– मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो. त्यामुळे मानवी मनोरे उभारू नयेत.

– उत्सव साजरा करता येणार नसला तरी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे आदी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात यावेत. त्या ठिकाणी मास्क, हॅण्ड सॅनिटायझर इत्यादीचा वापर करावा, असे सरकारच्या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.

– मुंबई, ठाणे येथील गोविंदाला जागतिक वलय आहे. पाच ते दहा मानवी मनोरे रचून उंचच उंच हंडय़ा पह्डण्याची दरवर्षी होड लागते.

– माझगाव ताडवाडी, यंग उमरखाडी, बालवीर, नवशक्ती गोविंदा पथक, जय जवान क्रीडा मंडळ, श्री दत्त सेवा मंडळ, अंबिका सेवा मंडळ, प्रेमनगर गोविंदा पथक आदी नामांकित गोविंदा पथकांचा मानवी मनोरे रचण्याचा थरार जगाला तोंडात बोट घालायला लावतो.

– यावर्षी या मंडळांनी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी स्वतःला आवर घातला. समाजहितासाठी त्यांनी दहीहंडी साजरी न करण्याचा निर्णय घेतला.

– दरवर्षी गोपाळकाल्याच्या आधी दोन महिन्यांपासून गोविंदा मंडळांच्या सरावाला सुरुवात होते. एकावर एक तीन गोविंदा उभे राहून मैदाना चालण्याचा सराव करतात. हंडी पह्डण्यासाठी लावलेल्या थरांवर चढताना नियंत्रण ठेवता यावे यासाठी सरावाला वेगळे महत्त्व आहे.

– मुंबईत गोविंदा मंडळांचा सराव पाहण्यासाठीही गर्दी होते इतका हा लोकप्रिय उत्सव आहे. यावर्षी मात्र मैदाने गोविंदांच्या सरावाअभावी ओस पडली होती. गोविंदांना देण्यात येणाऱया नामांकित पंपन्यांच्या जाहिरातींचे हार्ंडग्जही यंदा दिसले नाहीत.

…तर गुन्हा दाखल करून अटक करणार

कोविडचा प्रादुर्भाव आणि तिसऱया लाटेचा धोका लक्षात घेता दहीहंडी साजरी करण्यासाठी जमाव करू नका. यासंबंधी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र तरीदेखील कोणी जमाव करून दहीहंडी करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे. जमाव जमवून कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण करणाऱया व्यक्ती आणि संघटनांवर पोलीस कडक नजर ठेवणार आहेत. अशी मंडळे आणि व्यक्तींवर कोरोनासारखा महामारीचा आजार पसरविण्यास मदत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून संबंधितांना अटकेची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

भयानक संकटाचा समन्वयाने मुकाबला

मुंबई, ठाण्यातील सुमारे 1200 गोविंदा पथकांनी यावर्षी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला हे काwतुकास्पद आहे. स्वतःच्या आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणे हे गोविंदा मंडळांनी आपले कर्तव्य मानले. कोरोनाचे संकट भयानक आहे. त्याचा मुकाबला संघटितपणे आणि समन्वयानेच केला पाहिजे. तेच गोविंदा मंडळांनी यावर्षी दाखवून दिले.

– बाळा पडेलकर, अध्यक्ष, दहीहंडी उत्सव समन्वय समिती

शैक्षणिक साहित्याची हंडी

दरवर्षी मोठय़ा उत्साहात आणि आनंदात आम्ही दहीहंडी साजरी करतो. यावर्षी सरकारच्या आवाहनानुसार आम्ही दहीहंडी साजरी करणार नाही. त्याऐवजी चिपळूणमधील पूरग्रस्त भागातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आम्ही करणार आहोत. मुंबई, ठाणे, पालघरमधील गोविंदा पथकांनी त्यासाठी मदत केली आहे. त्या पथकांमधील 25 गोविंदा मिळून या उपक्रमासाठी चिपळूणला जात आहोत.
– कमलेश भोईर, संस्थापक, यंग उमरखाडी गोविंदा पथक

सामाजिक उपक्रमांचा गोपाळकाला
यंग उमरखाडी गोविंदा पथक, वडाळ्याचे अष्टविनायक व यश गोविंदा मंडळ, वाकोल्याचे सूर्योदय गोविंदा मंडळ, डिलाईल रोडचे अशोक मंडळ आदी अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडीऐवजी समाजोपयोगी उपक्रम राबवून गोपाळकाला साजरा करण्याचा निर्णय यावर्षी घेतला आहे. काही मंडळांनी गोपाळकाल्यानिमित्त कोरानाबाबत जनजागृतीचेही कार्यक्रम आयोजित केले आहेत.