बच्चू कडू यांचं ठरलं! मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून 11 वाजता निर्णय करणार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थानाने पाडून सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाला आहे. त्यामुळे तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्तेतील तिन्ही भागीदार मलईदार खात्यांसाठी अडून बसले आहेत.

शिवसेनेशी गद्दारी करून सरकार स्थापन केल्यानंतर वर्ष उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात अजित पवार गटही सत्तेत सहभागी झाल्याने मंत्रीमंडळ विस्तरा आणि खातेवाटपही रखडले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा हा चेंडू दिल्ली दरबारी गेलेला असतानाच मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे आमदार बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे.

दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या भेटीनंतर गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची साडे अकराच्या सुमारास बैठक आहे. या बैठकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही याबाबत माहिती मिळेल. अशातच मंत्रीपदी वर्णी लागणाऱ्या आमदारांना मुंबईत बोलावल्याची माहिती असून आपल्यालाही याबाबत फोन आल्याचे बच्चू कडू सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत मला फोन आलेला आहे. याबाबतीत 11 वाजता मंत्रीमंडळात सहभागी व्हायचा अथवा नाही याबाबत माझी भूमिका जाहीर करणार आहे. त्यांनी मला फोन करून बोलावले आहे. विस्ताराबाबत काय निर्णय घ्यायचा हे मी 11 वाजता मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून जाहीर करणार आहे, असे बच्चू कडू टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

भाजपला साथ देणे हा चुकीचा निर्णय; बच्चू कडू यांनी पुन्हा व्यक्त केला संताप

मंत्रीमंडळ विस्तार का रखडला याबाबत आपल्याला माहिती नाही. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस याबाबत सांगू शकतील, असेही एका प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले. इथून पुढे कशासाठी राजकारण करायचं? कुणासाठी आपण धावलं पाहिजे? कसे सामोरे जायचे? ही भूमिका आज 11 वाजता जाहीर करेन, असेही ते म्हणाले.

मिंधे गटाची गोची; अतिरेकानंतर स्फोट होईल, बच्चू कडू यांनी व्यक्त केली खदखद