दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आधी पोहोचतो; पराभवातून सुजय विखेंचं वादग्रस्त वक्तव्य

sujay-vikhe-patil

लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात चुरशीची लढत झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजपच्या सुजय विखे यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवातून सुजय विखे धडा घेतील, अशी जनतेची अपेक्षा होती. मात्र, विखे यांची मुजारी कायम असल्याचे दिसून येत आहे. विखे जनतेला भेटत नसल्याचे तसेच कोणलाही वेळ देत नसल्याने त्यांच्याविरोधात नाराजी होती. आता जनतेच्या जखमेवर मीळ चोळणारे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वकत्व्यावर संताप व्यक्त होत आहे.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात राजकारणाबाबत वक्तव्य केले आहे. एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, आता मोकळाच आहे, मी ठरवलंय की एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण-गोंधळ, हजर राहायचे. दहावा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या आगोदर सुजय विखे हजर राहील असे वादग्रस्त वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे.

बदलेले राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो, मात्र लोकसभेनंतर मी खूप काही शिकलो असेही ते म्हणाले आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी शिर्डी विधानसभा क्षेत्रात गाठीभेटी घेत आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी पराभवातून धडा घेतला नसून त्यांची मुजोरी कायम असल्याचे दिसून आले आहे.