
क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट मोठ्या पडद्यावर 2022 मध्ये पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी याची घोषणा केली असून आपल्या सोशल हँडलवर त्याचा एक टीझर पोस्ट केला आहे. या टीझरला काही वेळातच चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वांकडून या घोषणेचं स्वागत केलं जात आहे. हा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
https://www.facebook.com/sameer.vidwans/videos/10226115165445227/
समीर विद्वांस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकणार नाही. सावित्रीबाईंच्या स्मृतीस वंदन करून
सांगू पाहतोय… अन्यायाविरूद्धच्या अभूतपूर्व लढ्याची कथा! ‘महात्मा’”
विशेष म्हणजे याचे दोन भाग असणार आहेत. ‘महात्मा’ या टिझरमधून त्यांनी क्रांतीसूर्य भाग-1 आणि क्रांतीज्योती भाग-2 असे झळकताना दिसतात. अनीश जोग आणि रणजित गुगळे यांनी याची निर्मिती केली आहे. अजय-अतुल यांचं संगीत या चित्रपटाला देण्यात आलं आहे.
विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
अशी अक्षरे या टिझरमध्ये झळकतात आणि मग झळकते चित्रपटाचे नाव ‘महात्मा’. टिझर सुरू असताना मागे वाजणारे संगीत अंगावर काटा आणते. या टिझरनंतर चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे.



























































