महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी बजावला मतदानाचा हक्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी हांगे या गावात आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे आपल्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, असा विश्वासही निलेश लंके यांनी व्यक्त केला. या निवडणुकीत अमाप पैसा आणि प्रशासनाचा दुरूपयोग करण्यात आल्याचा आरोपही लंके यांनी केला आहे