अजुनि यौवनात मी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयाची चाळिशी आली तरी क्रिकेट खेळण्याची रग आपल्यात कायम आहे असे सांगत टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपला निवृत्तीचा निर्णय पुन्हा गुलदस्त्यात ठेवला आहे. शनिवारी तामीळनाडूतील आपल्या चाहत्यांसमोर बोलताना चेपॉक स्टेडियमवर प्रेक्षकांच्या उपस्थितीत आयपीएल लढत खेळण्याची इच्छा धोनीने व्यक्त केली. ती अंतिम लढत पुढच्या वर्षी असेल अथवा येत्या पाच वर्षांनी कधीही असेल तरीही खेळणार अशी गर्जना त्याने केली.

‘चेन्नईच्या क्रिकेट चाहत्यांनी मला नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे. कारकीर्दीतील घरच्या मैदानावरील अखेरचा एकदिवसीय सामना मी रांची येथे खेळलो. त्यामुळे आता अखेरचा टी -20 सामना चेन्नईच्या जर्सीत चेन्नईतील चेपॉकवर खेळायला आवडेल, परंतु तो सामना पुढील पाच वर्षांत कधीही येऊ शकतो, असे धोनी म्हणाला.