भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी महेश राऊतला विशेष एनआयए न्यायालयाने झटका दिला. राऊतने आजीच्या उत्तरकार्यासाठी तात्पुरता जामीन मागितला होता. मात्र त्याच्याविरोधातील आरोपांचे गंभीर स्वरूप आणि सरकारी पक्षाचा आक्षेप विचारात घेत न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला. महेश राऊतने आजीच्या उत्तरकार्याला हजर राहण्यासाठी दोन आठवडय़ांकरिता जामिनावर सोडण्याची विनंती केली होती. त्याच्यातर्फे अॅड. विजय हिरेमठ आणि अॅड. आरती रानडे यांनी अर्ज केला होता. या अर्जावर विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्यापुढे सुनावणी झाली.