माहीम-माटुंगादरम्यान रेल्वे रुळाला तडे, पश्चिम रेल्वे विस्कळीत

1002

पश्चिम रेल्वेच्या माहीम ते माटुंगा या स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी चर्चगेटच्या दिशेनं जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप होत आहे.

धीम्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याने अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.  त्यामुळे माटुंगा, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी या स्थानकांवर लोकलचा थांबा काही काळासाठी रद्द करण्यात आला आहे. तर वांद्रे स्थानकात अनेक लोकल रद्द करण्यात आल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून रुळांच्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या