मुख्यमंत्री, आम्हाला वाचवा! माहुलवासीयांचा आक्रोश सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून माहुलवासीयांना जीवघेण्या प्रदूषणामध्ये लोटणाऱ्या रहिवाशांनी आज ‘मुख्यमंत्री आम्हाला वाचवा’ अशा जोरदार घोषणा देत देवेंद्र फडणवीस यांना बॅनर दाखवले. मुख्यमंत्री आज चेंबूरमध्ये सूफी संमेलनाला आले असता माहुलवासीयांनी आंदोलन केले. यावेळी चेंबूर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

मुंबईमधील माहुल परिसरात रिफायनरीमुळे प्रचंड प्रदूषण आहे. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने माहुलकासीयांना इतर ठिकाणी घरे देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशांची अंमलबजाकणी पालिका प्रशासन किंवा सरकार करीत नसल्याने मुख्यमंत्री सूफी संमेलनाला आले असता ‘मुख्यमंत्री साहेब आम्हाला वाचवा’ असे बॅनर दाखवण्यात आले. शिवाय आज घाटकोपर, चेंबूर, विद्याविहार परिसरात प्रकल्पग्रस्तांनी रॅली काढून आंदोलन केले.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या अकार्यक्षमतेचा निषेधही आंदोलकांनी केला. जोपर्यंत प्रशासन आमची दखल घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्या रेखा घाडगे यांनी सांगितले. यापुढेही जर मुख्यमंत्री आम्हाला केळ देणार नसतील तर त्यांच्या मुंबईमधील प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी माहुलकासीय जाऊन ‘आम्हाला काचका’ असे बॅनर दाखकतील, असा इशारा रेखा घाडगे यांनी दिला.

‘म्हाडा’, ‘एसआरए’, ‘पीएपी’मधील घरे मिळणार
माहुलवासीयांना ‘म्हाडा’, ‘एसआरए’ आणि ‘पीएपी’मधील घरे देण्याबाबत विचार सुरू असल्याचे आश्वासन ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले आहे. आंदोलनाच्या सातव्या दिवशी शनिवारी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पुढाकाराने सामंत यांच्यासोबत ही बैठक पार पडली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यादेखील उपस्थित होत्या. या बैठकीत म्हाडा, एसआरए व पालिकेकडील रिक्त घरे माहुलवासीयांना देण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. याबाबत दिवळीनंतर पुन्हा बैठक होणार असल्याचे आमदार कुडाळकर यांनी सांगितले.