
सामना प्रतिनिधी । बीड
माजलगाव शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली असून नागरिकांना समस्यांना समोरे जावे लागत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतांनाही नगराध्यक्ष स्वतःच्या मस्तीत वागत असुन सूजलगाव नगर पालिकेला शासनाने शहराच्या विकासासाठी दिलेला तब्बल 35 कोटी चा विकास निधी मागील 2 वर्षा पासुन नगराध्यक्षांच्या उदासीनते मुळे तसाच पडून आहे. निदान दुष्काळात होरपळत असलेल्या शेतकरी, कष्टकरी यांच्या साठी शासनाने तो परत घ्यावा व जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठीन उपयोगात आणावा. निदान शेतकर्यांना थोडासा दिलासा तरी मिळेल अशी विनंती व मागनी शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना करण्यात येणार आहे.
नगराध्यक्ष सहाल चाऊस हे कायम वादात सापडलेले असतात. शहरात अशांतता माजवण्यात त्यांचे कुटुंब कायम पुढे असतं. पालिकेतील सर्व कर्मचारी व नगरसेवक त्यांच्या त्रासाला कंटाळले असुन. ननगरपालिकेची मालमत्ता स्वतःच्या मालकी असल्या सारखी वापरत असून यांच्या मनमानी कारभार व अनियमितता, भ्रष्टाचार व गुन्हेगारी प्रवृत्ती मुळे जिल्हाधिकारी बीड यांनी ५ ऑक्टोबर रोजी शासना कडे चाऊस यांना अपात्र करण्यासाठी शिफारस केली आहे.
प्रधान सचिव म्हैसकर यांना भेटून या संदर्भात तत्काळ निर्णय घेण्यात यावा असे निवेदन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिले. त्यावर लवकरच कारवाईची प्रया पुर्ण करण्याचेचे आश्वासन म्हैसकर यांनी दिले.
न्यायाल्याने दोषी ठरवलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व भ्रष्टाचाराचे आरोप असनार्या नगराध्यक्षाला तत्काळ अपात्र घोषीत करावे अशी मागणी मुख्यमंञी देवेंन्द्र फडणवीस यांच्या कडे करणार असल्याची माहीती शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी दिली.



























































