माजलगाव धरण काठोकाठ भरले; सहा हजार क्यूसेसने पाण्याच्या विसर्ग

जायकवाडीचा दुसरा टप्पा असलेल्या माजलगाव धरणाच्या कार्यक्षेत्रात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणांत पाण्याची आवक सुरू असल्याने बुधवारी रात्री धरण काठोकाठ 100 टक्के भरले आहे.त्यामुळे रात्रीच धरणाचे 5 दरवाजे उघडून6 हजार क्यूसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाने नदिखालील 14 गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

माजलगाव परिसरात व कार्यक्षेत्रात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने दररोज धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत होती. बुधवारी सकाळी 4 हजार क्यूसेसने पाण्याचा प्रवाह समाविष्ट होत होता तो सायंकाळी चार वाजता वाढून 8 हजार क्यूसेस एवढा झाला व धरण 97 टक्के भरले होते तर पाणीपातळी 431.70 एवढी झाली होती.शंभर टक्के भरण्यास अवघे अर्धा फूट पाणी पातळीची आवश्यकता होती.धरणांत क्षणाक्षणाला पाण्याच्या होणाऱ्या वाढीवर धरण अभियंता बी.आर. शेख,धरण मुकादम एस.डी. कुलकर्णी आदीसह कर्मचारी डोळ्यात तेल घालून लक्ष देत होते अखेर रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धरण व पाणी पातळी पाहणी केली व त्यानंतर दहा वाजता धरणाचे6,10,11,12 हे पाच दरवाजे 0.40 मीटरने उघडून त्यातून 8 हजार क्यूसेसने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणात 6000 क्यूसेसने कार्यक्षेत्रातुन व नाथसागर धरणातून400  क्यूसेसने पाणी येत असल्याने गुरुवारी सकाळी धरणातून सोडण्यात येणारे पाण्याच्या 8 ऐवजी 6हजार क्यूसेसने विसर्ग करण्यात येत आहे.

नदीपात्रात पाणी सोडल्यावर माजलगाव शहर, मनुर, गोविंदपूर, सांडस चिंचोली, लुखेगाव, शिंपे टाकळी, देपेगाव, अंदापुरी, नागडगाव,आदीसह 14 गावात तहसील प्रशासनाने दवंडी देऊन सावधानता बाळगण्याचे कळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या