
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले. नुकतेच या मालिकेत यश आणि नेहा यांचा लग्नसोहळा अगदी दिमाखदार पद्धतीने पार पडला. त्यांचा साखरपुडा, यशची बॅचलर पार्टी, नेहाची मेहंदी, हळद यामध्ये घडलेली धमाल तर प्रेक्षकांनी पाहिलीच. सोबत यश आणि नेहाचा लग्न सोहळा शानदार पद्धतीने झाला. यानंतर नेहा-यश आपली वटपौर्णिमा साजरी करताना दिसणार आहेत. जन्मोजन्मी नेहाच बायको म्हणून लाभू दे, अशी प्रार्थना करताना यश दिसणार आहे.
याव्यतिरिक्त ‘सत्यवान आणि सावित्री’ ची कथा सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 वाजता पाहता येईल. यामध्ये वटपौर्णिमेच्या व्रताची कहाणी सांगितली जाणार आहे.
























































