पॅरिसच्या बेकरीमध्ये भीषण स्फोट, 12 जण जखमी

सामना ऑनलाईन । पॅरिस

पॅरिश शहरातील एका बेकरीमध्ये शनिवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे अनेक 12 जखमी झाले आहेत, तर पाच जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. या स्फोटात बेकरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या स्फोटानंतर या भागात मोठी आग लागली. हा स्फोट एक अपघात होता असे प्रशासनाकडू सांगण्यात येत आहे.

Explosion accidentelle dans le 9e arrondissement : une cellule d’accueil est mise en place à la Mairie du 9e arrondissement. Toutes les personnes choquées ou ayant des demandes liées à cet événement peuvent s’y présenter et bénéficier d’un accompagnement.

— Paris (@Paris) January 12, 2019

इमारतीच्या तळ मजल्याला मोठी आग लागली असून स्फोटात जवळील गाड्यांचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल घटनास्थाळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. तसेच जखमींना जवळच्या इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.