
शिक्षिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला मालाड पोलिसांनी अटक केली. रणजित उकेंद्रकुमार ऊर्फ मुन्ना असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
तक्रारदार या शिक्षिका आहेत. त्या गोरेगाव येथील एका खासगी शाळेत शिकविण्याचे काम करत आहेत. मे महिन्यात त्यांच्या एका नातेवाईकाचे निधन झाले. त्यामुळे त्या वाराणसी येथे गेल्या. तेव्हा त्यांच्या घरी कोणी नव्हते. घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटा त्यांच्या घरात शिरला. चोरटय़ाने त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे कॉईन आणि पैसे चोरून पळ काढला. अंत्यविधी उरकून त्या घरी आल्या तेव्हा त्यांना घरपह्डी झाल्याचे लक्षात आले. घडल्याप्रकरणी त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.