मालाडमधून बेपत्ता झालेल्या मुलांना पोलिसांनी शोधले मुलांनी रात्र रिक्षात बसून काढली

1190
प्रातिनिधीक फोटो

बालदिनाच्या पूर्वसंध्येला मालाड येथून बेपत्ता झालेल्या सात मुलांना कुरार पोलिसांनी अवघ्या 12 तासांत शोधून काढत त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. कुरार पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कुरारच्या पालनगर येथे राहणारी तीन मुले ही एकाच शाळेत शिकत होती. बुधवारी लागलेल्या परीक्षेच्या निकालात कमी मार्क मिळाल्याने ते घाबरले. घरी ओरडतील या भीतीने ते तिघे मालाड येथून दादरला आले. त्यानंतर ते तिघे मुंब्रा येथे गेले.  त्या तिघांनी रात्र रिक्षात बसून काढली. रात्री उशिरा मुलांच्या पालकांनी कुरार पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर आणखी एका कचरा वेचणाऱया महिलेने आपली चार मुले पारेख नगर येथील गार्डनमधून बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. मुलांना शोधण्यासाठी पाच पथके तयार केली. वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज चाळके यांच्या पथकाने तपास सुरू केला.

भीतीपोटी पळून गेलेली मुले आज कुरार पोलिसांना मालाड परिसरात दिसली. त्या तिघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. तर चार मुले कांदिवली येथे त्याच्या मावशीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या चौघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. मुलांच्या आईकडे फोन नसल्याने मावशीने मुले घरी आल्याचे कळवले नव्हते. त्या चौघांना पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या