सुखदु:खाचा लपंडाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मलिका अमरशेख

यशस्वी माणसं सुखीसमाधानी असतीलच असं नाही. कारण पुन्हा त्यांच्या सुखाच्या कल्पना वेगळय़ा असतात. भौतिक जगात यशस्वी असलेला माणूस घरच्या संकटांनी दुःखी असू शकतो. रामदास स्वामी म्हणतात तसं ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ पण जरा जगण्याचा न् दृष्टिकोनाचा अँगल बदलला तर आपण यशस्वीरीत्या समाधानी होऊ शकतो…! आपण छोटय़ा छोटय़ा सुखांकडे लक्षच देत नाही. आपण या नजरेनं सुंदर जग पाहू शकतो…

यश कशाला म्हणायचं? न् यशस्वी माणूस कुणाला म्हणायचं? खूप नाव… खूप लौकिक… खूप पैसा? की खूप समाधानानं हसणाऱया माणसाच्या लुकलुकत्या डोळय़ातल्या आनंदाला यशस्वी माणूस म्हणायचं? एव्हरेस्टवर झेंडा लावणाऱयाला की चंद्रावर पाऊल ठेवणाऱयाला की ‘पीपीई’ किटमध्ये घामाघूम होतात, पण आजारी माणसाची सेवा करणाऱया अनाम वीरांना की वणव्यात आगीत शिरून प्राण्यांना वाचवणाऱया अनाम शूरांना?

आपले माणूसपणाचे निकष आजकाल पैसा न् प्रसिद्धी यावर अवलंबून असतात. कोणता माणूस चांगला, कोणता वाईट याची प्रत्येकाची स्वतंत्र व्याख्या असते. वस्तुतः सरसकट अख्खा पूर्णच्या पूर्ण चांगला न् पूर्णच्या पूर्ण वाईट अशी माणसं फक्त आपल्या प्रिय हिंदी फिल्म्समध्येच असतात. हाडामांसाच्या माणसामध्ये आपण अर्धे अर्धे वाटले गेलोय. आपल्याला हवं तेव्हा आपण कधी कधी चांगले वागतो कधी कधी वाईट! अर्थात त्या वाईटाचं पण स्पष्टीकरण आपल्याकडे असतंच. न् तशी सोय आपण सर्वांनी आपापल्या सोयीसाठी केलीय… हेच बघ नं… स्वतःला संताप आला पिंवा समोरच्यानं आपला गुन्हा केला की जर आपण त्याला ठार केलं तर आपण ताबडतोब गुन्हेगार ठरतो. न् हेच जर आपण सैनिक झालो तर दुसऱया देशातली अनेक माणसं मारायची परवानगी मिळते आपल्याला न् वर पदक मेडल, सन्मान पण!

तर माणूसच काय, किडामुंगी पण जो मारणार नाही तो संतच! पण म्हणून तो यशस्वी माणूस आहे का? हा कळीचाच मुद्दा… तो जर भ्रष्ट असेल… बायकांचा दलाल असेल तर? आपण संतांना अर्धदेवत्व बहाल करतो कारण खूप निरुपद्रवी वागून, चांगलं वागून ते आपली जबाबदारी चांगल्या वागण्याची स्वतःवर घेतात. देव, संतमहात्मे हे अशा खुंटय़ा होतात पिंवा आपण त्यांना करतो की आपल्या जबाबदाऱया, संकटं, निर्णय घेण्याची आयुष्याला सामोरं जाण्याची खडतरता त्यांच्यावर टांगून आपण मोकळे होऊ शकू… ‘तूच बघ रे बाबा’ असं म्हटलं की झालं! त्यात नंतर दुय्यम खुंटी म्हंजे बाबा लोक! न् बेजबाबदारपणे मास्क न लावता किंवा रस्त्यावर कचरा फेकता फेकता सहजपणे शिव्या देता याव्यात यासाठी वेगळी व्यवस्था केलेली आहेच आपण!

उच्च शिक्षण, बंगला, गाडी, पैसा, फॉरेनमध्ये शिकणारी मुलं, अवैध मार्गानं मिळवलेला पैसा हे सारं आपले स्टेटस् सिंबॉल झालेत. याआधीच्या पिढय़ा तत्त्व, मूल्य, आदर, प्रेम, विनय हे आदर्श न् यशस्वी माणसांची लक्षणं मानत होते… त्याही आधीची पिढी स्वातंत्र्य, देश यानं भारावलेली प्राण तळहातावर घेऊन बलिदान करणाऱया माणसाला यशस्वी जीवन मानायची…

माणसानं केलेला विकास, अत्याधुनिक तंत्रज्ञान हा यशस्वीपणाचा निकष मानावा तर अणुस्पह्ट-जैविक शस्त्र यानं तर आपणच सर्वनाशाच्या उंबरठय़ावर पोचलो आहोत, कॉम्प्युटरवर ज्ञानाबरोबर पैशाच्या फसवणुकी प्रचंड वाढल्यात. म्हणजे आपण विकासाच्या नक्की कोणत्या पायरीवर आहोत? हा प्रश्नच आहे. यशस्वी, सुखीसमाधानी होण्यासाठी प्रत्येक जण धडपडतो, पण आयुष्य न् व्यवस्था हे इतपं बेरकी की काही वेळा ते चेटकीण होतं. काही वेळा चकवा… न् आपण लपंडाव, पकडापकडी खेळत राहतो सुखदुःखाबरोबर!

कोरोनाकाळात प्रत्येकाने या लपंडावाशी हातमिळवणी केली. काहींना नैराश्य आलं. काहींना एकटेपणा खायला उठला तर काहींनी यातच सुखाच्या नव्या व्याख्या शोधल्या. खरंतर एकटेपणातही खूप गंमत असते हे नव्याने कळलं. स्वतःला निरखताना, स्वतःला वेळ देताना समाधानाची लकेर आपसूकच उमटली. कुणाला खिडकीमधल्या नव्या आभाळाची ओळख झाली तर कुणाला आकाशाचेही विविध रंग दिसले. आपलं आपलं अवकाश शोधताना या रंगांची ओळख नक्कीच नव्याने उमजेल. सुखीसमाधानी असण्याची खूणच जणू. खरंतर यातच यशस्वी असण्याची व्याख्या दडली आहे.

यशस्वी माणसं सुखीसमाधानी असतीलच असं नाही. कारण पुन्हा त्यांच्या सुखाच्या कल्पना वेगळय़ा असतात. भौतिक जगात यशस्वी असलेला माणूस घरच्या संकटांनी दुःखी असू शकतो. रामदास स्वामी म्हणतात तसं ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ पण जरा जगण्याचा न् दृष्टिकोनाचा अँगल बदलला तर आपण यशस्वीरीत्या समाधानी होऊ शकतो…! आपण छोटय़ा छोटय़ा सुखांकडे लक्षच देत नाही. आपण या नजरेनं सुंदर जग पाहू शकतो…, आपलं काम स्वतंत्ररीत्या करू शकतो कारण आपण हातीपायी धड आहोत. आपल्या डोक्यावर छप्पर आहे जे जगात कित्येकांना नाही; आपण आजारी पडलो तरी डॉक्टरकडे जाऊ शकतो पिंवा निसर्गानं आपली रचनाच अशी अद्भुत केलीय की आपले आजार शरीरच आपोआप बरं करू लागतं! कापलं तरी रक्त आपोआप काही क्षणांतच थांबतं! पहा किती छोटी गोष्ट, पण किती महत्त्वाची!

आपण पुनर्जन्म घेऊ शकतो! आपली मुलं हा आपला पुनर्जन्मच नव्हे काय? आपण घडताना झालेल्या चुका आपण मुलांना वाढवताना दुरुस्त करू शकतो! निसर्गानं आपल्याला फळं दिलीत… मधुर सुंदर चवीची… समुद्र आपल्याला खूप काही देतोय… पूर्ण पृथ्वीच आपल्याला सगळं देत आलीय हे किती मोठं समाधान आहे! न् आपण निसर्गाचं लाडपं अपत्य आहोत हे किती मोठं समाधान आहे!

[email protected]