
‘अदानींची संपत्ती वाढवण्याची कला देशातील गरीब, शेतकरी आणि मजुरांना शिकवा. अदानींना 13 लाख कोटी रुपयांची मदत केलीत तशी देशातील लोकांना किमान 13 लाख रुपयांची तरी मदत करा.’ असा टोला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला. भाजपा सरकार सभागृहातील खरे मुद्दे कामकाजातून हटवून लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
झारखंडच्या साहेबगंज जिह्यात आयोजित एका मेळाव्यात ते बोलत होते. ‘2019 मध्ये उद्योगपती गौतम अदानी यांची मालमल्ला एक लाख कोटी रुपये होती. अडीच वर्षात ती 13 लाख कोटींवर पोहोचली. ज्यांच्या विमानाने मोदी पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला आले होते तेच हे अदानी होते. मोदींनी जनतेच्या पैशातून आपल्या या मित्राला निधी दिला.’ अशी टीका खर्गे यांनी केली.



























































